मतलबी ह्या दुनियेत
आयुष्य आपले घडवा
पैसे पण लागतात हो…
प्रेमाची दौलत उडवा…💶
उडवता उडवता लक्षात येईल
सर्वच आपल्या सोबत आहे…
तुमच्या काम पेक्षा त्यांच्या कामांना महत्त्व आहे…🤨
करत राहू त्यांच्या अपेक्षा पूर्ण
नसेल कसला हेवा देवा..
थोडा वेळ काढला स्वतः साठी की
तुझेच वाभाडे निघतील भावा…🤬
देण्याची भूक आहे आपल्याला…
त्यांना घेण्याची…
त्यांना नचवायची सवय आहे
आणि आपल्याला नाचायची…😎
आत्मसन्मान जाणुन
उचल आपले पाऊल…
कडेलोट कर त्या लोकांचा
ज्यांना नाही तुझ्या प्रेमाची साधी चाहूल..🫡
बघ मग,
करशील यशाची नवी शिखरे पादत्राण
होईल तुझे ही तुझ्या मनासारखे…
अडकलेले, मरगळलेले व थकलेले तुझे शरीर
वागेल विचारवंतांन सारखे….🤩
जयेश 🖊️
Leave a Reply